ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज ट्रस्टच्या वतीने 50 लाखाची मदत
गोंदवले / वार्ताहर
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर गोंदवले बुद्रुक येथील श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ट्रस्टच्या वतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीमध्ये पन्नास लाख रुपये आज जमा करण्यात आल्याची माहिती समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली.
श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा गरजूंना मदतीचा वारसा येथील समाधी मंदिर समिती अविरतपणे पुढे चालवत आहे.श्री महाराजानी दिलेल्या श्रीराम नामाच्या शिकवणी बरोबरच भुकेलेल्याना अन्न,गोरक्षण तसेच रुग्णांची सेवा हा वारसा देखील आजही येथे सुरू आहे.श्री महाराजांनीही ऐन दुष्काळात लोकांच्या हाताला काम देऊन आधार दिला होता.याशिवाय अनेक संकटात लोकांच्या मदतीला ते धावून जात.हीच परंपरा समाधी मंदिर समितीने सुरू ठेवली आहे.
सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उपाययोजना सुरू आहेत.याकामी मानवतेच्या भावनेतून आपणही मदत करावी याबाबत समाधी मंदिर समितीने विचारविनिमय करण्यात आला आणि तात्काळ यासाठी मान्यता देण्यात आली.समितीच्या वतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत पन्नास लाख रुपये जमा करण्यात आले.
------------------